पिंपरी : रावेत पोलिसांनी वाल्हेकरवाडी रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई केली. यामध्ये ८ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास करण्यात आली. इम्तियाज चांदभाई सय्यद (वय ३६, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विनोद कदम यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रावेत-वाल्हेकरवाडी रोडवर द हॉट कॉफी दुकानाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती रावेत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हुक्का पार्लरवर छापा मारून कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर असा आठ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपी इम्तियाज सय्यद हा हुक्का फ्लेवर उपलब्ध करून तो ग्राहकांना पुरवत होता.
Fans
Followers